Nov 02, 2020

 

हेमंत हा ऋतु मार्गशीष व पौष या दोन महिन्यांमध्ये शरद ऋतुनंतर येतो. हेमंत ऋतुमध्ये रज:कण, धुळीनी दहाही दिशा माखलेल्या असतात. उत्तरेकडील शीतप्रवाहयूक्त वायू वाहत असतो. जलाशय नद्या बर्फाने आच्छादित असतात. हेमंत ऋतुमध्ये थंडीमुळे शरीराची सर्व छिद्रे आंकुचित होवून बंद झाल्याने बलवान शरीराचा उष्मा कोंडला जावून जाठराग्री अधिक बलवान होतो. त्यामुळे गुरुपदार्थाचे सेवन अधिक मात्रेत करावे.

हेमंत ऋतुमध्ये मकरसंक्रातीचा सण असतो. या काळात धातूंचे पचन होण्यास सुरूवात होते. म्हणूनच या काळात उष्ण आणि स्निग्ध गुणांचे सेवन करणे हितकारक ठरते त्यामुळे या काळात तीळ, गुळ आणि स्त्रीयांच्या वाणातील शेंगदाणे, ऊस, बोर, या वस्तु लाभदायक आहेत.

 

पथ्यकर आहार

 • हेमंत ऋतुमध्ये गुरूपदार्थाचे सेवन अतिमात्रेत करावे.
 • आहारामध्ये मधुर, अम्ल, लवण रसात्मक, उष्ण, स्निग्ध द्रव्यांचे सेवन हितकर आहे.
 • दुग्धजन्य आहार - दुध, तुप, लोणी आणि दूधाचे सर्व पदार्थ आहारामध्ये घ्यावेत. (बासूंदी, श्रीमंड, पनीर)
 • धान्य - गहु, ज्वारी, सातु, तांदुळ, तांबडी साळ इ, धान्यांचा वापर करावा, नवीन तांदळाचा भात खावा.
 • द्विदल धान्य - मुग, उडीद, धने, जिरे, तूप इ. यांची फोडणी देवून यूष / सुप/ वरण करावे.
 • पालेभाज्या - तांदुळजा, शेवगा या पालेभाज्या चालतील.
 • फळभाज्या - पडवळ, घोसावळे, कोबी, फ्लॉवर, नवलकोल दोडका, मुळा इ. चालतील.
 • फळाहार - डाळींब, द्राक्षे, मनुका, नारळ, केळी काजु, बदाम, पिस्ता इ. फळे व सुकामेवा इ. चे सेवन या ऋतु मध्ये हितकर आहे.
 • मांसाहार - मासे, ससा, कोंबड़ी, बोकड्याचे मांस आणि पुष्कळ चरबी असलेले मांस सेवन करावे.
 • जलपान - हेमंत ऋतुमध्ये दररोज गरम पाण्याने स्नान आणि गरम पाणी प्राशन करावे,
 • इतर – स्निग्ध मांसरस, गुळाची दारू, धान्यादिकांची दारू, सुरामंड, कणीक किंवा रवा, ऊस इ.पासून बनवलेली पक्वान्ने सेवन करावी. ताजे अन्न, वसा व तैल इ. सेवन करावे, मदीरा, शीधु आणि मध,, अनुपान करावे.

 

पथ्य विहार

 • अंगास शिकेकाई वगैरे पदार्थांचे पाणी लावून ओशटपणा धुवून काढावा.
 • यथाविधी स्नान करून अंगास केशर- कस्तुरी चे उटणे लावून अगरूची धूरी द्यावी.
 • सकाळी उठताच वातघ्न  तैलांचा अभ्यंग करून टाळूस तैल जिरवावे आणि व्यायाम करावा.
 • हाथ-पाय धूण्यास ऊन पाणी घ्यावे.
 • अंथरूण-आसन यावर गरम, उबदार असणारे प्रावरण (रजई), रेशमी वस्त्र, दुलई, रंगीत कांबळी
 • गालिचा यांनी आच्छादित असावी. उन्हात बसणे, हिंडणे, स्वेदन करणे (steaming), गरम तळघरात व उबदार मानघरात राहणे इ. व्यवहार करावे. प्रवास करताना थंडीच्या कालावधीमध्ये मर्व बाजूंनी आच्छादित अशा वाहनातून जावे.
 • नेहमी पायमोजे व जोडे घालावे.
 • मैथून (शरीरसंबंध) करावे, (वैद्याच्या सल्ल्यानुनार)

 

अपथ्यकर आहार

हेमंतऋतुमध्ये वातवर्धक आहार करू नये.

अल्प आहार आणि पाण्यात कालवून सत्तू पीठ खाऊ नये.

 

अपथ्यकर विहार

थेट अंगावर येणार्‍या जोर्‍याच्या वार्‍याच्या झोतात राहणे, दिवसा झोपणे इ. करू नये.

 

 Suggested Blogs

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Curabitur sagittis

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Curabitur sagittis

 •   Dr. Santosh Deshmukh
 •   Jun 23, 2020

Etiam semper viverra scelerisque. Aliquam ipsum lorem, sodales sed hendrerit in, eleifend a elit. Integer eleifend tellus commodo massa condimentum ac tristique neque tempus. Duis scelerisque commodo felis eget aliquam.

Read More
blog

blog

 •   Dr. Santosh Deshmukh
 •   Jun 23, 2020

Etiam semper viverra scelerisque. Aliquam ipsum lorem, sodales sed hendrerit in, eleifend a elit. Integer eleifend tellus commodo massa condimentum ac tristique neque tempus. Duis scelerisque commodo felis eget aliquam.

Read More
तुळशीवर उपाय

तुळशीवर उपाय

 •   Dr. Santosh Deshmukh
 •   Oct 10, 2020

test  तुळशीवर उपाय  तुळशीवर उपाय तुळशीवर उपाय तुळशीवर उपाय तुळशीवर उपाय तुळशीवर उपाय तुळशीवर उपाय तुळशीवर उपाय

Read More